Organic Maps : ऑफलाईन भटकंती, सायकल व मार्गनिर्देशन
Organic Maps हे गोपनीयतेला प्राधान्य देणारे ऑफलाइन नकाशांचे अॅप आहे. पायी भटकंती, सायकलिंग, धावणे आणि वाहन चालवण्यासाठी यात GPS नेव्हिगेशन, ट्रॅक रेकॉर्डिंग आणि मार्ग नियोजन उपलब्ध आहे. पूर्णपणे मोफत. जाहिराती नाहीत. तुमच्या हालचालींवर पाळत नाही. ओपन-सोर्स समुदायाने आणि MapsWithMe/Maps.Me अॅप तयार करणाऱ्या त्याच लोकांनी प्रेमाने विकसित केलेले. OpenStreetMap च्या डेटावर आधारित.
नकाशे डाउनलोड केल्यानंतर Organic Maps वापरून तुम्ही ठिकाणे शोधू शकता, मार्ग आखू शकता, GPS ट्रॅक रेकॉर्ड करू शकता आणि इंटरनेट कनेक्शनशिवाय दिशादर्शन वापरू शकता. मोबाइल डेटा किंवा रोमिंग शुल्काशिवाय दुर्गम पायवाटा शोधा किंवा परदेशात प्रवास करा.
ऑक्टोबर २०२६ मध्ये Organic Maps च्या इन्स्टॉलची संख्या १२ दशलक्षांहून अधिक झाली. आम्हाला वाढण्यास मदत करा!
Organic Maps इथून डाऊनलोड व स्थापीत करा : AppStore, Google Play, FDroid, Huawei AppGallery, Obtainium, Accrescent




वैशिष्ट्ये
Organic Maps सह प्रवास नियोजित करा, मार्ग शोधा आणि अन्वेषण करा:
- OpenStreetMap च्या आभारे, इतर नकाशांवर अस्तित्वात नसलेल्या ठिकाणांसोबत सखोल ऑफलाईन नकाशे
- GPS ट्रॅक रेकॉर्डिंग सोबत प्रत्यक्ष वेळेतील आकडेवारी
- थांब्यांच्या क्रमाच्या स्वयंचलित अनुकूलनासह अनेक थांब्यांचे मार्ग नियोजन
- सर्वात जलद आणि सर्वात लहान मार्गांमधून निवडा
- व्हॉइस मार्गदर्शन आणि CarPlay/Android Auto सह कार, सायकली आणि चालण्यासाठी टर्न-बाय-टर्न दिशानिर्देश
- बस, ट्राम, मेट्रो आणि लाइट रेलने प्रवासासाठी सार्वजनिक वाहतुकीचे मार्ग नियोजन
- नकाशावर वेगवान ऑफलाईन शोध
- पायी भटकंती, सायकलिंग आणि माउंटन-बाइक मार्गांचे थर
- पायवाटा, कॅम्पिंगची ठिकाणे, झोपड्या, निवारे आणि पाण्याचे स्रोत ठळकपणे दाखवणारी मैदानी उपक्रमांसाठीची खास नकाशा शैली
- समोच्च रेषा, शिखरे, उतार आणि उंचीची माहिती असलेल्या मार्गांचे व ट्रॅकचे उंचीचे आलेख
- नियोजित मार्ग जतन करा आणि भविष्यातील प्रवासासाठी वापरा
- बुकमार्क आणि GPS ट्रॅक KML/KMZ, GPX आणि GeoJSON स्वरूपात आयात, निर्यात आणि शेअर करा
- Google Takeout च्या
Saved Places.jsonफाइलमधून Google Maps मध्ये जतन केलेली ठिकाणे आयात करा - iCloud बॅकअप आणि समक्रमण (iOS)
- थेट OpenStreetMap मध्ये ठिकाणे जोडा आणि संपादित करा
- रूलर टूलने सरळ रेषेतील अंतर मोजा
- तुमच्या डोळ्यांच्या संरक्षणासाठी, गडद मोड
- लोकप्रिय ठिकाणांसाठी विकिपीडिया लेख
- तुम्ही दिलेल्या टाइल सर्व्हर URLद्वारे प्रायोगिक उपग्रह प्रतिमा
- विनामूल्य व मुक्त स्रोत
ऑर्गेनिक (सेंद्रिय) कशाला?
Organic Maps हे शुद्ध व सेंद्रिय आहे, व प्रेमाने निर्मित आहे:
- तुमच्या गोपनीयतेचा आदर करते
- तुमची बॅटरी वाचवते
- कोणतेही अनपेक्षित मोबाइल डेटा शुल्क नाही
Organic Maps अॅप माहिती चोरांपासून आणि इतर वाईट गोष्टींपासून मुक्त आहे:
- विना जाहिराती
- महितीचा मागोवा नाही
- डेटा संग्रह नाही
- त्रासदायक नोंदणी नाही
- कोणतीही अनिवार्य शिकवणी नाही
- त्रासदायक ईमेल नाही
- अधिसूचना नाही
- कचरासॉफ्टवेयर नाही
कीटकनाशक नाहीशुद्ध व सेंद्रिय!
Exodus गोपनीयता Project कडून तपासलेले ऍप:
iOS साठी TrackerControl कडून तपासलेले iOS ऍप:
तुमच्यावर गुप्तहेरी करायला Organic Maps अनावश्यक परवानग्या मागत नाही:
Organic Maps मध्ये आम्ही ह्या विचारांचे आहोत की गोपनीयता हा प्रत्येकाचा मानवी हक्क आहे:
- Organic Maps हे एक समुदाय चलित मुक्त स्रोत प्रकल्प आहे
- बिग टेकच्या गुप्तहेरी नजरेपासून आम्ही तुमचे रक्षण करतो
- तुम्ही जिथे कुठे असाल तिथे सुरक्षित रहा
गुप्तहेरी नाकारा - तुमचे स्वातंत्र्य स्वीकारा.
ह्या निःशुल्क ऍपचा खर्च कोण काढत आहे?
हे ऍप सर्वांसाठी विमानुल्य आहे. आम्हाला पाठिंबा द्यायला कृपया देणगी द्या!
सोयीस्करपणे देणगी देण्यासाठी, खाली दिलेल्या तुमच्या पसंतीच्या पेमेंट पद्धतीच्या चिन्हावर क्लिक करा:
खालील प्रिय संस्थात्मक प्रायोजकांनी काही पायाभूत सुविधा खर्च कव्हर करण्यासाठी आणि निवडलेल्या नवीन वैशिष्ट्यांच्या विकासाला निधी देण्यासाठी लक्ष्यित अनुदान प्रदान केले आहे:
|
|
शोध आणि स्रोत सुधारणा प्रकल्प NGI0 Entrust Fund द्वारे निधीत केला गेला. NGI0 Entrust Fund ची स्थापना NLnet Foundation ने युरोपियन कमिशनच्या Next Generation Internet कार्यक्रमाच्या आर्थिक पाठिंब्याने, DG Communications Networks, Content and Technology च्या अंतर्गत अनुदान करार क्रमांक 101069594 अंतर्गत केली आहे. |
|
|
Google ने 2022, 2023, 2024, 2025 कार्यक्रमांदरम्यान Google Summer of Code कार्यक्रमात विद्यार्थी प्रकल्पांना पाठिंबा दिला. उल्लेखनीय प्रकल्पांमध्ये Android Auto, विकिपीडिया डंप एक्स्ट्रॅक्टर, Android ट्रॅक रेकॉर्डिंग यांचा समावेश आहे. |
|
ISP Mythic Beasts आम्हाला नकाशा डाउनलोड आणि अपडेट्स होस्ट करण्यासाठी आणि सर्व्ह करण्यासाठी 400 TB/महिना पर्यंत मोफत बँडविड्थसह दोन व्हर्च्युअल सर्व्हर प्रदान करतो. |
|
|
FUTO ने फेब्रुवारी 2023 मध्ये Organic Maps ला $1000 चे सूक्ष्म अनुदान दिले. |
समुदाय
Apache License 2.0 परवान्य अंतर्गत Organic Maps हे एक मुक्त स्रोत सॉफ्टवेअर आहे.
- नवीन सुविधा वापरून पाहण्यासाठी, सुधारणा सुचवण्यासाठी आणि त्रुटी कळवण्यासाठी आमच्या बीटा कार्यक्रमात सहभागी व्हा:
- बग किंवा त्रुटी आम्हाला इशू ट्रॅकर or ईमेल द्वारे कळवा.
- नवीन कल्पना किंवा वैशिष्ट्ये सुचवण्यासाठी चर्चा करा.
- नविनतम माहितीसाठी आमच्या टेलिग्राम चॅनल किंवा मैट्रिक्स स्पेस चे सदस्य व्हा.
- इतर वापरकर्त्यांसोबत चर्चा करायला आमच्या टेलिग्राम गटात सहभागी व्हा.
- आमच्या GitHub पृष्ठावर भेट द्या.
- FOSStodon, Facebook, Twitter, Instagram, Bluesky, Threads, Patreon, YouTube, Reddit, LinkedIn, TikTok वरुन आमची माहिती मिळवा.
